चाळीसगाव ;- शहरातील मालेगाव रोड परिसरातून १८ वर्षीय मूक बधिर तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी कि ,
नासिर खान हैदर खान पठाण वय 55 वर्ष धंदा-मजुरी रा. पवारवाडी, रहेमान नगर, चाळीसगांव ता. चाळीसगाव हे पत्नी इरफाना खान, भाऊ शकिल खान हैदर खान पठाण, भावाची पत्नी सैदाबी शकील खान व त्यांची मुलगी नौशिनबानु शकील खान वय 18 वर्ष हि असुन यांच्यासह एकत्र कुटुंबात राहत असुन मजुरी करुन परीवाराचा उदरनिर्वाह भागवतात . नौशिनबानु हि लहान पणापासुन मुक बधिर आहे.
26 रोजी नौशीनबानू हि दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली . मात्र तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने अखेर तिचे काका नासिर खान यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.