महाराष्ट्र राज्य सेपक टाकरा असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि वर्धा जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन यांच्या वतीने 24 वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर व 23 वी सब ज्युनियर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा वर्धा येथे दि.5 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन जळगाव यांच्यावतीने दि. 31 जानेवारी 2024 वार बुधवार या दिवशी सायंकाळी ठीक 4:00 वाजता निवड चाचणी अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, प्रताप नगर, जळगाव च्या क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे.
तरी या निवड चाचणीस 19 वर्ष व 14 वर्षाखालील मुले व मुली सहभाग नोंदवू शकतात या निवड चाचणीत निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र सेपक टाकरा असोसिएशन आणि वर्धा जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र असतील. या निवड चाचणीत येताना खेळाडूंनी चार पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड झेरॉक्स, जन्म दाखल्याचा झेरॉक्स , आदी .