पारोळा :-तालुक्यातील एका गावात 26 वर्षीय मतिमंद मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकिस आला असून या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादीची बहीण ही 26 वर्षीय असून ती मतिमंद असल्याचा फायदा आरोपी जीवन बापू पाटील राहणार भोंडण तालुका पारोळा याने घेत दिनांक एक जून ते 20 जून दरम्यान तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण करून तिला १७ आठवड्यांची गर्भवती केल्याची फिर्याद पीडीतेच्या बहिणीने दिली.
याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपी जीवन बापू पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नांदवळकर करीत आहे.