यावल तालुक्यातील विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांचा प्रहार पक्षात जाहीर प्रवेश
यावल ;- प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष श्री.बच्चू कडू ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यातील विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी तसेच अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर पक्ष केला.
यावल रावेर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून नवे विकासपर्व उभारण्यासाठी प्रहार ठामपणे कार्यरत राहणार आहे या कार्यात जे येतील त्यांच्या समवेत या परिसराच्या कल्याणासाठी कणखरपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रहार यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे यांनी दिला आहे.
केवळ यावल तालुका नव्हे, तर संपूर्ण रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून प्रहारात प्रवेश करु इच्छिणाऱ्यांची मोठी संख्या असून त्यांच्या माध्यमातून या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, सर्वधर्मसमभावाचा प्रहारचा झेंडा सध्या जाती-जाती आणि धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रकार हेतूतः होत असल्याचे सांगून प्रहार पक्षात सर्वधर्माचे गुण समाविष्ठ आहेत. सर्वधर्म समभावाची शिकवण देणा-या प्रहारच्या ध्वजाखाली सर्वानी एकत्रित यावे व विकासाचे नवे पर्व खुले करावे, असे आवाहनही अनिल चौधरी यांनी त्यांच्या भाषणात केले.
कार्यक्रमास अनिल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सचिन झाल्टे यांनी सुत्रसंचालन केले तर गणेश बोरसे यांनी आभार मानले यावेळी जळगांव शेतकरी जिल्हाउपाध्यक्ष गणेश बोरसे, जिल्हाउपाध्यक्ष विलास पांडे, जळगांव युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, जळगांव मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष विनोद निकम, यावल माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, हाजी अत्ताउल्लाह खान, अल्पसंख्याक यावल तालुकाध्यक्ष हाजी हकीम शेख, यावल माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, अल्पसंख्याक यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख आलिम शेख, माजी नगरसेवक दिलीप वाणी, थेरोळा सरपंच व सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शुभम पाटील, यावल युवक तालुकाध्यक्ष राकेश भांगळे, पारसाडे माजी सरपंच बबिता तडवी, यावल शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोकुळ कोळी, रावेर तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, पिंपरूड सरपंच योगेश कोळी, सावखेडा बु. सरपंच रवी महाजन, सावखेडा खू. युवराज कराड, माजी सरपंच खेमचंद कोळी, माजी सरपंच तायडे, माजी नगरसेवक बिलाल शेख, अट्रावल उपसरपंच योगेश कोळी, विनोद कोळी, ग्रामपंचायत सदस्य रफिक तडवी, आमोदे सरपंच, पातोंडी सरपंच, खिरवड सरपंच, पिंप्री सरपंच, मोहगन सरपंच, सांगावी बु सरपंच, यावल-रावेर ह्या तालुक्यातील अनेक पदाधिकारी ह्यावेळी आवर्जून उपस्थित होते.