खान्देशजळगांवशासकीय

जळगावात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील रुजू होणार

जळगाव – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी लातूर येथील मुळचे युवराज पाटील हे आपला लातूर येथील पदभार सोडल्यानंतर पुढील आठवड्यात जळगावचा पदभार स्वीकारणार आहेत. युवराज पाटील हे 2006 पासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

माहिती व जनसंपर्क विभागातील बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून मुळचे जळगाव येथील असलेले सुरेश पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी लातूर येथील युवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. पाटील हे मंत्रालयात सात वर्षे सहाय्यक संचालक या पदावर होते. त्यानंतर पुणे येथे सहाय्यक संचालक तर अकोला, सातारा, लातूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. युवराज पाटील हे लेखक असून त्यांची ‘विकासाचा दीपस्तंभ’ व ‘मुलूक माझा’ ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आकाशवाणीवरील पर्यटन मालिकेत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. प्रशासकीय कारर्किदी अगोदर ते पुणे तरुण भारतमध्ये पत्रकार तर भारती विद्यापीठात मुख्य जनसंपर्क अधिकारी होते.युवराज पाटील हे येत्या आठवड्यात आपला पदभार स्वीकारणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button