खान्देश टाइम्स न्यूज | ६ फेब्रुवारी २०२४ | शनिपेठेत शनिमंदिर समोरील एका घराच्या तळमजल्यावर १८ एप्रिल २०१७ रोजी पहाटे पूर्ववैमनस्यातून प्रवीण माळी या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयीत भीमा उर्फ पंकज वाणी याचा कारागृह बंदिवान कैदी म्हणून उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
शनी मंदिराजवळ असलेल्या ओंकार वाणी यांच्या घराच्या तळमजल्यात मंगळवार दि.१८ एप्रिल २०१७ रोजी मध्यरात्रीपासून प्रवीण उर्फ नितीन सुरेश माळी (वय २८, रा. सत्यम पार्क), भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय २६, रा. विसनजीनगर) व राहूल जयराम सपकाळे (वय २३, रा. काचंननगर) हे तिघे पत्ते खेळत बसले होते. जुन्या वादातून पहाटे ४ वाजेच्या सुमारास भीमाने प्रवीणचा डोक्यात दगड मारून खून केला होता. त्यानंतर पंकज आणि राहूल दोघे फरार झाले होते.
गुन्ह्यातील मुख्य संशयित पंकज हा बुधवारी पहाटे घरी गेला. त्याने त्याच्या आईला भुसावळ येथे पाठवले. त्यानंतर जळगावला थांबणाऱ्या एका एक्स्प्रेस रेल्वेने मुंबईकडे पसार झाला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासात त्याला सीएसटी रेल्वेस्थानकातून अटक केली होती. तर राहुल सपकाळे याला असोदा रस्त्यावरून अटक करण्यात आली होती.
गुह्यातील मुख्य संशयीत भीमा उर्फ पंकज अशोक वाणी वय – ३७ याला जुनाट टिबी आणि फिट्स येण्याचा आजार होता. गेल्या काही वर्षापासून तो कारागृहातच होता. टीबीच्या आजारामुळे गेल्या ६ महिन्यात प्रकृती खालावल्याने त्याला १० ते ११ वेळा उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि.३ फेब्रुवारी रोजी पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.