जामनेर :- मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नव वर्षात नवीन संकल्पनांसह विविध योजनाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या योजनांमध्ये जीवन संजीवनी योजना, दिपज्योती योजना, मातृवंदना योजना, आधार वड योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या योजनांतर्गत रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. रागिणी पारेख यांच्या सारख्या नामांकित डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा आता जामनेरमध्ये मिळणार आहे. जर एखादा रुग्ण सरकारी योजनेत बसत नसेल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा चॅरिटी बेडच्या माध्यमातून त्या रुग्णावर मोफत उपचार करण्यात येतील.
मंगळवारी पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, डॉ. रोहन पाटील, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ. सतीश पाटील, डॉ.नितीन महाजन, डॉ.तुषार पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, डॉ.सरिता महाजन, डॉ. प्रशांत भोळे, डॉ. मनोज विसपुते, डॉ.रितेश पाटील, डॉ.योगेश सरताळे, डॉ.स्वप्नील निकम, श्री. शिवाजी सोनार, श्री. चंद्रकांत बावीस्कर, श्री. विवेक पाटील, डॉ. किरण पाटील, न्यू रुबी स्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सीईओ डॉ. धनराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. तर ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, आरोग्यदूत श्री. रामेश्वर नाईक यांनी या लोकार्पण सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी विविध योजनांची माहिती दिली.
डॉ. बशिरुद्दीन अन्सारी (कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट न्यू रुबी स्टार हॉस्पिटल) यांनी यावेळी जीवन संजीवनी योजनेविषयी माहिती दिली. जीवन संजीवनी योजनेअंतर्गत हृदयरोग तपासणीपासून ते एंजियोप्लास्टीपर्यंत संपूर्ण उपचार केवळ ९९९ रुपयांमध्ये करण्यात येणार आहेत. यात ई.सी.जी, २डी ईको, स्ट्रेस टेस्ट, कॉर्डीओलॉजी कंसल्टेशन, एंजिओग्राफी, एंजियोप्लास्टी योजनेअंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. यानंतर डॉ सप्नील पाटील (नेत्ररोग तज्ज्ञ न्यू रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर) यांनी दिपज्योती योजनेची माहिती देताना सांगितले कि, दिपज्योती योजने अंतर्गत नेत्र तपासणी, चष्म्यांचे नंबर काढणे, सायेचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात येईल. तसेच अत्याधुनिक बिना टाक्याचे लेझर मशीन (फेको), मोतीबिंदु ऑपरेशन फक्त ७००० रुपयांमध्ये करण्यात येईल. यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे व डॉ. रागीनी पारेख मॅडम या सदरील योजनेसाठी दरमहा जामनेरला उपलब्ध असतील.
यानंतर डॉ. राजेश नाईक (स्त्रीरोग तज्ज्ञ, न्यू रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर) यांनी मातृवंदना योजने बद्दल सविस्तर माहिती दिली. मातृवंदना योजने अंतर्गत सर्व गरोदर मातांची तपासणी विनामुल्य होईल. पुर्वतपासणीसाठी आलेल्या गरोदर मातांची पहिली सोनोग्राफी मोफत करण्यात येईल. सर्व गरोदर मातांना पुढील ३ महिन्यापर्यंत रक्तवाढीसाठी हिमोग्लोबीनच्या व कॅल्शीयम गोळ्या मोफत देण्यात येतील. प्राथमिक रक्त तपासणी व गरोदर मातांना धनुर्वात लस मोफत देण्यात येईल. पुढे आधार वड योजने विषयी डॉ. नितीन गायकवाड ( एमडी मेडिसीन) माहिती देतांना सांगितले की, योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरीकांसाठी हृदयरोग, ई.सी.जी, नेत्र तपासणी, दातांची तपासणी, मुखरोग व दंत तपासणी, गर्भाशयाचे कॅन्सरची व स्थनातील गाठीची मोफत तपासणी करण्यात येतील. तसेच अल्पदरात फिजीओथेरेपी आणि दर आठवड्याला योगासन वर्ग मोफत घेण्यात येणार आहेत.
न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जामनेर येथे सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. सदर योजना ६ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत कार्यान्वित असतील. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. धनराज चौधरी यांनी केले आहे.