खान्देशगुन्हेजळगांव

हॉकी स्टिक डोक्यात मारुन तरुणाला केली दुखापत ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगावः ;– रुकसार माझ्यासोबत बोलते म्हणून तिला तु तुझ्या घरी का येवू देत नाही, तु आमच्या आतमध्ये येत आहे असे म्हणत अरमान याकुब पटेल (वय ४२, रा. अयोध्यानगर) यांच्या डोक्यात हॉकी मारुन गंभीर दुखापत केली. ही घटना दि. ७ फेब्रुवारी रोजी अजिंठा चौफुली परिसरात घडली.

याप्रकरणी नईम बुलेट याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरमान याकुब पटेल (वय ४२) – हे वास्तव्यास आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास नईम बुलेट रा. मासुमवाडी याने अरमान याकुब पटेल यांना फोन करुन रुकसार बाबत बोलायचे असे म्हणत त्याला अजिंठा चौफुलीवर बोलावून घेतले. अरमान पटेल हा त्याठिकाणी आला असता, नईम बुलेट याने त्याला रुकसार माझ्यासोबत बोलते, म्हणून तू तुझ्या घरी का येवू देत नाही, व तु माझ्या आणि रुकसारच्या आतमध्ये येत आहे असे म्हणून त्याच्यासोबत वाद घालीत त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्याजवळील हॉकी अरमान यांच्या डोक्यात टाकून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी अरमन पटेल याच्या तक्रारीवरुन नईम बुलेट याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button