
मुंबई :- भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी बोरिवलीमध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यातील आरोपीनेदेखील स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बोरिवली, दहिसर परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. अभिषेक घोसाळकर हे मॉरिस नोरोन्हा याच्या बोरिवली येथील आयसी कॉलनीतील कार्यालयात गेले होते. येथे त्यांनी मॉरिस नोरोन्हासोबत फेसबुक लाईव्ह केले. त्यात त्यांनी आमच्यात काही मतभेद नसून आम्ही लोकांसाठी एकत्र काम करणार आहोत, अशी ग्वाही दिली. त्यानंतर यातील संशयित मॉरिस बाजूला निघून गेल्यानंतरअभिषेक यांनीदेखील फेसबुक लाईव्हवर आमच्यातील मतभेद संपल्याचे सांगून आपल्या आसनावरून उठत असतानाच त्यांच्यावर एका मागून एक अशा पाच गोळ्या झाडण्यात आल्या, हा थरारक प्रकार फेसबुकवर लाईव्ह प्रसारित झाला. अभिषेक यांच्या पोटात पहिली गोव्ये लागली. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर एक गोळी लागल्याचे दिसून येत होते. ही सर्व घटना मॉरिसने त्याच्या कार्यालयातच केली. या वेव्यै महिलांसाठी साड्यांचे वाटप केले जाणार होते. त्यासाठी अभिषेक यांना मॉरिस यानेच बोलावले होते. आरोपी मॉरिस याने आधीच कटरचल्याप्रमाणे त्याच्याकडील पिस्तुलातून अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या व त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याने त्याचाही मृत्यू झाला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक यांना तत्काळ बोरिवली येथील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अभिषेक यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले, पैशाच्या व्ादातून मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस दलातील। वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थव्यवरील सीसीटीव्ही फुटेज व साक्षीरांच्या साक्षीनंतर या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.




