चाळीसगाव ;- चाळीसगाव शहरातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील आतापर्यंत फरार असलेल्या आरोपी सिद्धांत आनंदा कोळी यास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून धुळे येथून ताब्यात घेऊन अटक केली.
या गुन्हेतील आता पर्यंत सौरभ आंनदा कोळी, वसंत बच्छाव, पृथ्वी कुमावत, चित्रा मोरे, जय मोरे, विष्णू नेवरे, अमोल सिताराम कोळी, राहुल नारायण कोळी या आरोपींना अटक करण्यात आली आहे तर या घटनेतील मुख्य आरोपी आनंदा उर्फ अण्णा कोळी अजूनही फरार आहे या गुन्हेगारांचा एल सी बी जळगाव सह चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे चार तुकड्या शोध घेत आहेत.