चाळीसगाव ;- तीन दिवसांपूर्वी टोळक्याने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले येथील माजी नगरसेवक महेंद्र (बाळू ) मोरे यांचे नाशिकला उपचार सुरू असतांना आज पहाटे त्यांचे निधन झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , ७ फेब्रुवारी रोजी चाळीसगावात गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. यात एका कारमधून आलेल्या टोळक्याने माजी नगरसेवक महेंद्र ( बाळू ) मोरे हे त्यांच्या कार्यालयात बसलेले असतांना त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता. यानंतर हे टोळके कारमधून पळून गेले होते.श सिंधी कॉलनी येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या ५ जणांनी कट्ट्यातून फायरिंग करत जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली होती. यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले होते आज पहाटे ३:३०वाजता त्यांच्या उपचारा दरम्यान मूत्यू झाला,दरम्यान, या प्रकरणी आधीच हल्ला करणारे पाच आणि कट रचणारे दोन अशा सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाल्याने या प्रकरणी खुनाचे कलम लावण्यात येणार आहे. तर, बाळू मोरे यांच्या निधनाचे वृत्त येताच परिसरावर शोककळा पसरली असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे