जळगाव ;-एका वेब पोर्टल मधून ट्रेडिंगमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितल्यावरून पाचोर्याच्या 39 वर्षीय तरुणाची नऊ लाख 54 हजार 600 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी १० रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राजेश प्रदीप कुमार संचेती वय 39 हे विमा एजंट असून जामनेर रोड तालुका पाचोरा येथे राहतात. त्यांना 14 नोव्हेंबर 2023 ते 23 डिसेंबर 2023 दरम्यान अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप ग्रुप वरील जे पी मॉर्गन नावाच्या वेब पोर्टल व्हाट्सअप ग्रुप मॉर्गन कॅपिटल बिल स्टॉप ग्रुप २२ या नावाने असलेल्या वेब पोर्टल मधून ट्रेडिंग मध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास सांगून व त्यांचा विश्वास संपादन करीत वेळोवेळी बँकेच्या खात्यामधून राजेश संचेती यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एचडीएफसी बँकेच्या पाचोरा व एसबीआय बँकेच्या पाचोरा या बँक खात्या मधून नऊ लाख 54 हजार 600 रुपये ऑनलाईन दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरून राजेश संचेती यांनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून १० फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.