जळगाव ;- वाळू व गौण खनिज माफियांची हिंमत वाढली असून त्याला जिल्ह्यातील आरटीओ अधिकाऱ्यांचाच आशिर्वाद असल्याचा आरोप छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात अपर उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी काही वाळू माफियांची वाहने अडविली असता या वाळू माफियांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांवरच प्राणघातक हल्ला चढविला. मात्र अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहन चालकाने त्यांना वाचविले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आ- हेत. वाळू माफियांची वाढत्या दादागिरी संदर्भात छत्रपती शिवाजी ब्रिगेडने पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलतांना अश-अशोक शिंदे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात वाळू तसेच गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात लूट होत असून यातून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या बळावर हे वाळू माफियां माजलेले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू उपसामुळे जिल्ह्यातील प्रदुषणाची हानी होत असून ती थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असतात. परंतु मुजोर वाळू माफिया प्रशासनातील अधिकाऱ्यांवरच हल्ले करुन त्यांच्यावर दहशत निर्माण करीत असतात. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहनांमधून ओव्हरलोड वाळू वाहतूक केली जाते. मात्र आरटीओ अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का? काही वाहनांना तर नंबरप्लेटही नसतात किंवा काही वाहनांच्या नंबर प्लेटवर काळा रंग फासलेला असतो. अशा वाहनांवर आरटीओ अधिकारी कारवाई का करीत देखील काही दिवसा- पूर्वी वाळू माफियांनी अशाच प्रकारे महसुल अधिकाऱ्यांवर हल्ला चढविला होता. त्याचीच पुनरावृत्ती जळगाव शहरात देखील झाली आहे. हे सर्व असेच होत राहिले तर अधिकाऱ्यांचे मुडदे पडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा छत्रपती शिव- ाजी ब्रिगेडने या गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्धार केला असून वेळप्रसंगी मंत्रालयासमोरही त्याबाबत आंदोलन छेडले जाईल, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.