सावदा ;- जय हिंद सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने मदार फाउंडेशनचे अध्यक्ष रहिम शाह सुलेमान शाह यांना सामाजिक सेवा क्षेत्रातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
सविस्तर वृत्त असे की दि. 10 रोजी दुपारी परभणी येथील जय हिंद सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सर्व क्षेत्रात सामाजिक सेवा करणारे तसेच रक्षा,, पुलिस ,, शिक्षण,,शिक्षक पत्रकारिता,, पत्रकार,, आरोग्य,,वैद्यकीय सामाजिक कार्य,, समाज सेवा असे अनेक सामाजिक कार्य करणाऱ्यांना या ठिकाणी सन्मानीत करून पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या ठिकाणी मदार फाउंडेशनचे अध्यक्ष रहिम शाह सुलेमान शाह यांना सामाजिक कार्य म्हणजे मदार फाउंडेशनचे वतीने 4 महिने पहिले मुस्लिम शाह बिरादरी सामुहिक विवाह सोहळा पार पडला होता या अनुषंगाने जय हिंद सेवाभावी संस्था यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 27 वा पुरस्कार जाहीर करून महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारामुळे रहीम शहा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.