खान्देशगुन्हेजळगांव

बुलेटची दुचाकीला धडक ; प्रौढ जखमी

जळगाव ;-भरधाव वेगाने जात असलेल्या बुलेटस्वाराने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार संजय यशवंत राणे (वय ५५, रा. गणेश कॉलनी) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बुलेटस्वाराविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गणेश कॉलनीत संजय राणे हे वास्तव्यास असून त्यांचा रंग विक्रीचा व्यवसाय आहे. दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास राणे हे दुकान बंद करुन घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी कोर्ट चौकाकडून गोलाणी मार्केटच्या दिशेने (एमएच १९, बी ४०१६) क्रमांकावरील बुलेट स्वार भरधाव वेगाने जात होता. त्याने समोरुन येत असलेल्या संजय राणे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये राणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचे नुकसान देखील झाले आहे. त्यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन बुलेट स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button