धरणगाव;- तालुक्यातील एका गावातून दोन अल्पवयीन मुलींना दोन तरुणांनी फुस लावून पळून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना आरोपी समाधान दंगल पाटील आणि जितेंद्र विजय जाधव या दोघांनी मिळून दोन्ही अल्पवयीन मुलींना फुस् लावून पळवून नेल्याची घटना 5 जुलै 2023 रोजी रात्री साडेआठ ते अकरा वाजेच्या सुमारास घडली दोन्ही मुलींच्या पालकांनी शोध घेऊनही ते सापडले नसल्याने व त्यांना आरोपी समाधान आणि जितेंद्र या दोघांनी पळवून नेल्याची फिर्याद ईश्वर धोंडू मोरे यांनी दिल्यावरून धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी करीत आहे.