खान्देशगुन्हेजळगांव

शोधायला गेले ड्रग्ज सापडला गुटखा

जळगाव : तरुणाने एमडी ड्रग्ज घेतल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक तरुणाच्या घरी शाहूनगरात ड्रग्ज शोधयला गेले. मात्र त्या तरुणाच्या घरात ड्रग्ज न मिळता प्रतिबंधित असलेला गुटखा मिळून आला. याठिकाणाहून पोलिसांनी ७४ हजारांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ किशोर निकुंभ व पोकों तेजस मराठे हे शुक्रवार दि. १ मार्च रोजी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना शाहूनगर परिसरात अयान हसन भिस्ती (वय २०, रा. शाहूनगर) हा नशेत असल्याचे आढळून आले. मात्र मद्याचा वास येत नसल्याने त्याने कुठल्यातरी आमली पदार्थाने नशा केल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी संशयित अयान भिस्ती यालापोलिस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एमडी ड्रग्जची नशा केला असल्याचे सांगत ते आपल्या घरात एमडी ड्रग्ज ठेवले असल्याचेपोलिसांना सांगितले.

पोलिसांचे पथक कारवाईसाठी अयान भिस्ती याच्या घरी गेले. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा भाऊ अन्सार हसन भिस्ती (वय २२) हा हजर होता. त्याच्या घराची झडती घेतली असता एमडी ड्रग्ज न सापडता प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

पोलिसांनी भिस्ती याच्या घरातून गुटख्याच्या या साठ्यासह रोख ३२ हजार २७० रुपये, प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ७४ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोकॉ तेजस मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अयान भिस्ती व अन्सार भिस्ती या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि कल्याणी वर्मा करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button