जळगाव ;-दुचाकीला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवार दि. ४ रोजी सायंकाळी ७ वाजता मानराजपार्क जवळ घडली. अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले .संजोग सुरेश सपकाळे (वय २०, रा. गाढोदा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे संजोग सपकाळे हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याचे मोठे काका नवल सपकाळे यांच्या मुलाला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याच्या जेवणाचा डबा घेवून नवल सपकाळे आणि संजोद हे दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले.
खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे जात असतांना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार काका पुतणे हे रस्त्यावर कोसळून तो मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने भरधाव अपघातात तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच मयत संजोग याच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
संजोग हा आयटीआयचे शिक्षण घेत असल्याने तो दररोज जळगावला येत होता. परंतु दुर्देवी काळाने त्याच्यावर झडा घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक केली जात होती. यावेळी त्याच्य कुटुंबियांनी एकच आक्रोश केल होता. संजोग याच्या पश्चा आई, वडील, मोठा भाऊ अस् परिवार आहे.