खान्देश टाइम्स न्यूज | ७ मार्च २०२४ | जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी गट क्रमांक २, लांडोर खोरी उद्यानाच्या पुढे शासकीय महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे १ लाख २७ हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयितांचा शोध घेत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमालासह रिक्षा आणि दुचाकी हस्तगत केली आहे.
मोहाडी गट क्रमांक २, लांडोर खोरी उद्यानाच्या पुढे शासकीय महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे १ लाख २७ हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्या आयुष कमलकिशोर मणियार वय – २६ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सतबिरसिंग बलवंतसिंग टाक (वय-२१) वर्ष, रा.शिरसोली नाका, तांबापुरा, गुरुजितसिंग सुजाणसिंग बावरी (वय-२२) वर्ष, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, तंजीम बेग नसीम बेग मिर्झा, (वय-36) वर्ष, रा.कपाट गल्ली, तांबापुरा यांना ताब्यात घेतले होते.
तिघांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरी झालेल्या साहीत्यापैकी ९७ हजार किंमतीचे साहीत्य व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोटारसायकल कडून दिली होती. तसेच तपासादरम्यान गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याने नरेंद्र मानसिंग पाटील, रा.अयोध्या नगर यांच्या घरी मागील वर्षी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. याबाबत एम.आय.डी.सी. पो.स्टे. यापुर्वी गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी सतबिरसिंग याच्यावर यापुर्वी चोरी घरफोडीचे १९ गुन्हे, गुरजितसिंग याचेवर ११ गुन्हे तसेच तंजीम बेग मिझा याचेवर ३ गुन्हे दाखल आहेत.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाडे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने केली आहे.