मुंबई ;- पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका पाहायला मिळत असून दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई झाली आहे असे म्हटले जात आहे. या जीआरमध्ये अनेक विकास कामांबद्दल निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा समावेश आहे. आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते, आणि त्यामुळेच राज्य सरकारने सहा आणि सात मार्च या दोन दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल 269 शासन निर्णय जारी केले आहेत. 7 मार्च रोजी 173 शासन निर्णय, तर सहा मार्चला 96 शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.