
इकरा शाहीन उर्दू शाळेत मराठी भाषा गौरव दिवस साजरा
जळगाव प्रतिनिधी
इकरा शाहीन उर्दू शाळेत २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिवस हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यासाठी मराठी विभागाचे उपशिक्षक अनिसा खान व तरन्नुम शेख यांनी या दिवसच्या महत्व सांगितले.तसेच त्यांनी सूत्र संचालन केले. व निदा फातेमा, रुखसार बी, मोहम्मद अली, अलान पटेल यांनी या दिवस साठी भाषण,अलीश्बा प्रविन, नमिरा शाह यांनी गीत गायन व विविध विधार्थी यांनी मराठी भाषा गौरव दिवस चे नकाशे बनवले होते.
कार्यक्रम मध्ये शाळे चे उपशिक्षक बरकत शेख, अतिक शेख, मेहरुन्निसा खान, कौसर खान, मंजूर सैयद, रीफत शेख व इतर हजर होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य श्री. काझी झमिरोद्दिन यांनी सर्वाना शुभेच्छा दिली