नवी दिल्ली : – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता नवे सरकार स्थापन होणार आहे.
जेजेपीचे तीन आमदार भाजपसोबत गेले असून इतर अपक्ष आमदारांच्या साथीने आता भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. लोकसभेच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपने जेजेपी सोबत असलेली युती तुटल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आता हरयाणामध्ये भाजप स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मनोहर लाल खट्टर आता लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.
भाजपकडे 41 आमदार असून जेजेपीचे तीन आमदार आणि अपक्ष दोन आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला कोणतीही अडचण येणार नाही.