जळगाव ;- येथील इकरा थीम कॉलेज मध्ये व्हर्मिकल्चर व्हर्मिकंपोस्ट आणि व्हर्मिवॉश विषयावर प्राणीशास्त्र विभागाअतंर्गत दि.11 मार्च ते 16 मार्च या दरम्यान एक सप्ताहाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ. चांद खान उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते श्री. एस.एस.धनगर यांनी व्हर्मिकल्चर, व्हर्मिकंपोस्ट आणि व्हर्मिवॉश विषयावर व्याख्यान दिले.
या कार्यशाळेत प्रा.पिंजारी इब्राहीम, डॉ.मुस्तकीम बागवान आणि डॉ.अमिन काझी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . हाफिज शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पटेल युसुफ यांनी केले. कार्यशाळेत परिसरातील शेतकरी, नागरिक महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.