खान्देश टाइम्स न्यूज | १३ मार्च २०२४ | देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहिली जात आहे. १५ मार्चपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पाहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, दुसरी यादी देखील जाहीर झाली असून भाजपने काही ठिकाणी धक्कातंत्र वापरले आहे. जळगाव आणि रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात महिला उमेदवार देण्यात आले असून जळगावात खा.उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीतील महाराष्ट्राची नावे पुढीलप्रमाणे..