दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी लांबविला अडीच लाखांचा ऐवज
जळगाव ;- दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील ड्रॉवरमधून २१ हजार ६०० रुपयांच्या रोकडसह साहित्य लांबवले. ही घटना दि. १३ रोजी सकाळच्या सुमारास न्यू. बी. जे. मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात प्रदीप रामचंदानी हे वास्तव्यास असून त्यांचे न्यू. बी. जे. मार्केटमध्ये गुरुनानक ट्रेडर्स नावाचे सबमर्शिबल स्पेअर पार्ट्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोरील दुकानाचे मालक ईश्वर पाटील यांनी दि. १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रदीप रामचंदानी यांना फोन करुन तुमच्या दुकानाचे शटर उघडे आहे तुम्ही लवकर या असे सांगितले. त्यानुसार प्रदीप रामचंदानी हे वडीलांसोबत दिसले.
यावेळी त्यांना दुकानाचे शटर वाकलेले दिसून आले. त्यांनी दुकानात जावून पाहणी केली असता, त्यांच्या दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला चोरट्यांनी रामचंदानी याच्या दुकानातून आठ दिवसांपुर्वी आणलेला माल तसेच त्यांच्या दुकानातील ड्रॉवरमधून २१ हजार ६०० रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. त्याचसोबत चोस्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरुन नेला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.