जळगाव : चटई कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय भावंड हे रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी रिक्षाने निघाले. परंतु रिक्षाचालक याने त्यांना तिथे न सोडता खेडीच्या दिशेने घेऊन गेला. त्यानंतर दोघांना मारहाण करीत त्यांच्या जवळील पाच हजारांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली होती. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळून जेरबंद केले.
शहरातील एमआयडीसी परिसरातील मिनाक्षी गोल्ड या चटई कंपनीत काम करणारा निलेश रामलाल शिलारे (वय २९, रा. रामटेक रय्यद, जि. हरदा, मध्यप्रदेश, ह. मु. रायपुर कुसुंबा) हा त्याचा भाऊ शिवा याच्यासोबत होळीनिमित्त दि. ९ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास गावी जाण्यासाठी निघाले. रेमंड चौफुली येथून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी ते रिक्षा बसले. परंतू रिक्षाचालक व त्याचा साथीदार अशांनी रिक्षा रेल्वेस्टेशन कडे न नेता खेडी पेट्रोलपंपाजवळ घेवून गेले. याठिकाणी रिक्षा चालकासह त्याच्या साथीदारारे परप्रांतीयांना मारहाण करीत त्यांच्याजवळील पाच हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली होती. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालक व त्याचे साथीदारा विरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांकडून रिक्षा चालकासह त्याच्या याथीदाराचा शोध घेतला जात होता. तो रिक्षा चालक एमआयडीसी परिसरातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, निलेश गोसावी, दीपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने केली.