जळगाव;- शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दापोरा ते शिरसोली दरम्यान असणाऱ्या रेल्वे रुळावर पूल परिसरात रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील दापोरा येथ उघडकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर त्र्यंबक वाणी (वय ३५, रा. दापोरा ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
ज्ञानेश्वर वाणी हा तरुण गावामध्ये आई-वडील, पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. शेतीकाम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शुक्रवारी १५ मार्च रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळल्यामुळे ते नैराश्याखाली आले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास दापोरा ते शिरसोली दरम्यान रेल्वे रुळावर पुलावर खंबा क्रमांक ४०७च्या १ ते ३ दरम्यान ज्ञानेश्वर वाणी यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.