
एरंडोल : – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टवर दुचाकी आदळून खडके सीम येथील प्रणय जितेंद्र पाटील (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कासोदा रस्त्यावर घडली होती. या तरुणावर उपचार सुरु असतांना तरुण मयत झाल्याची घटना घडली.
एरंडोल तालुक्यातील खडके सीम म येथे प्रणय हा वास्तव्यास होता. तो य रायसोनी महाविद्यालयात बी टेकच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. व्य शुक्रवारी सायंकाळी तो (एमएच १९ 1. ईजे २४३८) क्रमांकाच्या दुचाकीने एरंडोल येथे व्यायाम शाळेत व्यायामाला र आलेला होता. घरी परतत असतांना त कासोदा रस्त्यावरील कुंदन परदेशी न यांच्या शेताजवळील रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेले (एमएच १९ बीजी ५१७०) क्रमांकाचे ट्रॅक्टर उभे होते. या उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर प्रणयची दुचाकी धडकल्याने काळाने त्याच्यावर घाला घातला आणि त्यामध्ये प्रणयाचा दुर्देवी मृत्यू झाला. रिफ्लेक्टर, इंडिकेटर लावलेले नव्हते. तसेच कोणत्याही सुरक्षेतेची दखल न घेतल्याने ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रणयचा मृत्यू झाला. प्रणय हा एरंडोल तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा चुलत भाऊ होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार देशमुख, अनिल पाटील, अखिल मुजावर, मिलिंद कुमावत हे करीत आहेत.