खान्देशजळगांवराजकीयशासकीय

संजय पवारांनी राजीनामा द्यावा , डॉ. सतिष पाटील यांचा गैरसमज – आ. एकनाथराव खडसे

जळगावः – जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार फार मोठा माणूस नाही, मी त्याला उत्तर द्यावे. जनतेतून निवडून आला असे मला आठवत नाही. मी शरद पवारांसोबत प्रामाणिकपणे राहिलो. अजित पवारांनी साथ सोडून विश्वासघात केला. मी शरद पवारांच्या आमदारांच्या भरवशावर निवडून आलो. मला शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मते मिळाली, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. संजय पवारांनी राजीनामा द्यावा, तेच आमच्या साथीने जिल्हा बँकेत निवडून आले आहेत, असे आ. एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. अनिल पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. आ. खडसे यांनी राजीनामा देण्याची त्यांनी मागणी केली होती. दरम्यान, आज आ. एकनाथराव खडसे पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे.

अॅड रोहिणीताई खडसे यांनी लोकसभा बाबत विचार केलाच नाही त्या केवळ विधानसभा मतदार संघाचा विचार करीत आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना त्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आमची घराणेशाही नाही. आम्ही एक एक टप्पा पुढे सरकत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पोहचलो. आम्ही जनतेतून निवडून आलो आहे. संजय पवार जनतेतून निवडून आले नाही, असा टोला आ. खडसेंनी लगावला. आ. खडसेंनी सांगितले की, संजय पवारांच्या एकट्याच्या हाती अनेक पदे आहेत. आम्ही घराणेशाहीमुळे निवडून आलेलो नाही. मी पळ काढणारा माणूस नाही. सत्तेसाठी लाचार होऊन पाय पडले नाही. रक्षाताई जरी उभ्या असतील तरी मी तुतारी घेऊनच प्रचार करणार आहे. असे आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

आ. खडसे म्हणाले की, माजी मंत्री डॉ सतिष पाटील यांनी मला अगोदर विचारले असते तर त्यांचा गैरसमज दूर झाला असता. माघार घ्यायचीआहे. मी आजपासून नव्हे तर चार महिन्यांपासून आजारी आहे. मला निवडणूक पेलवणार किंवा नाही हे मी वैद्यकीय सल्ला घेतल्यावर जाहीर करेल असे वारंवार सांगितले होते. मला दीड महिन्यापूर्वी डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला. भाषण देखील आक्रमकपणे करू शकणार नाही. हृदयावर दडपण येईल. माझा वैद्यकीय अहवाल आल्यावर तो जयंत पाटील यांच्या हातात दिला आणि शरद पवारांना कळविले. निवडणूक लढविण्याची माझी पुरेपूर इच्छा आहे. पवारांची सभा जळगावात घेण्याची इच्छा माझी आहे. तुतारी चिन्ह मिळाल्यावर देखील सभा घेण्याची इच्छा होती. दि.२ डिसेंबर रोजी शरद पवारांनी माझ्या उमेदवारीबाबत वैद्यकीय कारण असल्याचे बैठकीत जाहीर केले होते, असे खडसेंनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button