
जळगाव ;-शहरातील तांबापुरा परिसरात असणाऱ्या एका बंद घराच्या लोखंडी दरवाजाचे गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश करून हॉलमध्ये असणाऱ्या कपाटातील लॉकर तोडून यातून सुमारे 48 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तांबापुरातील पटेल गल्लीतील रेशन दुकानाजवळ राहणाऱ्या तसलीमा बी मोहम्मद सय्यद यांचे घर असून अज्ञात चोरट्याने 26 जून 2023 ते 8 जुलै 2023 दरम्यान त्यांच्या घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून हॉलमधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील 23 हजार रुपये चे सोन्याचे दागिने आणि 25 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहे.