बिसन्डा ;- उत्तर प्रदेशातील बिसंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुंडा म्हणून बुलेट न मिळाल्याने पतीने आधी मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
त्यानंतर त्याने ट्रिपल तलाक दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणी 9 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण बिसंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिचे लग्न नोव्हेंबर 2018 मध्ये फतेहपूर येथे झालं होतं. वडिलांनी क्षमतेपेक्षा जास्त हुंडा देऊन लग्न करून दिलं होतं. पण हुंड्यावर सासरचे लोक समाधानी नव्हते. पाठवणीच्या वेळी हुंड्याव्यतिरिक्त बुलेट दोन लाख रुपयांची मागणी करत होते. बुलेट व पैसे न मिळाल्याने छळ सुरू झाला.
पीडितेने असंही सांगितलं की, तिला दोन मुले आहेत. तिने आपल्या मुलांसाठी हे सर्व काही सहन केले. दरम्यान, पतीने मुलाला हिसकावून घेऊन, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून दिलं. यानंतर तो हुंडा मागत होता. मात्र वडिलांकडे हुंडा देण्यासाठी पैसे नव्हते. पतीने सर्वांसमोर तलाक दिला.