खान्देशगुन्हेजळगांव

धरणगावातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न ; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा

धरणगाव ;- १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गांधीमळा परिसरातून दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव शहरातील परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह राहायला असून इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. १९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पीडित मुलगी ही क्लासला गेली होती. सकाळी १० वाजता क्लास सुटल्यानंतर ती घरी येत असतांना शहरातील गांधी मळा येथे विना क्रमांकाच्या पल्सर तोंडावर रुमाल बांधेले दोन अज्ञात इसम यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला बळजबरी दुचाकीवर बसवून पळवून नेत असताना मुलीने माझे काका पोलीस असल्याचे सांगताच दोघांनी तिला दुचाकीवरून खाली ढकलून देत जळगावकडे पोबारा केला .

पीडित पळत जाऊन हा प्रकार आपल्या मुलीचे काका आणि इतर नातेवाईकांना कथन केला . त्यानुसार नातेवाईकांनी धरणगाव पोलीस स्टेशनला त्अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि जीभाऊ पाटील हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button