जळगाव : -स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी) ही संघटना बेकायदेशीर संघटना असल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले आहे. या संघटनेवर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियमातील कालमानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनांच्या अनुषंगाने कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने करण्यात यावी तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याबाबत कळविण्यात आल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांनी एकापत्रकाद्वारे कळविले आहे.