जळगाव ;- – आपण सर्व होळी व धुलीवंदन हा सण दिनांक २४ व २५ मार्च २०२४ रोजी साजरा करणार आहोत. होळी व धुलीवंदन सणाचा आनंद घेत असतांना विविध रंगाची उधळण करतांना पाळीव प्राण्यांना त्याची ईजा होणार नाही याची काळजी सर्व नागरीकांनी घ्यावी. धुलीवंदनाच्या दिवशी विविध रंग, केमिकल, रासायनिक रंग पाळीव प्राण्यांच्या अंगावर टाकू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाळीव प्राण्यांच्या अंगावर विशेषतः शहरी भागात पाळीव कुत्र्यावर रासानिक रंग टाकल्यामुळे त्यांना ईजा होवू शकते. जर त्यांच्या डोळयातुन पाणी येत असेल अथवा डोळे लाल झाले असतील तर तात्काळ डोळे स्वच्छगार पाण्याने धुवून घ्यावेत. तसेच तात्काळ पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्रि नंबर १९६२ वर संपर्क करावा. तरी सर्व नागरीकांनी रासायनिक रंग पाळीव प्राण्यांच्या अंगावर किंवा डोळयात टाकू नये अन्यथा त्यांच्यावर प्राणीक्लेश प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारीआयुष प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.