जळगाव l २५ मार्च २०२४ l शहरातील जुने जळगाव मारोती पेठ परिसरातील रहिवासी असलेले हर्षल रविंद्र तिवाणे वय-२७ यांचे रविवार दि.२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. हर्षल हा सामाजिक कार्यकर्ता असून परीट समाजात तो सामाजिक कार्यात सहभागी होत होता. जुने जळगाव येथील दुर्गोत्सव, युवा मारुती पेठ गणेश मंडळ तसेच डेब्युजी फोर्स युवा ब्रिगेडमध्ये त्यांनी विविध पदांवर जबाबदारी पाहिली होती. हर्षल याच्या पश्चात आई, काका, काकू, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दि.२६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार असून नेरी नाका स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हर्षलच्या वडिलांचे दोन वर्षापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून आज हर्षलच्या निधनाने संपूर्ण तिवाणे परिवार, समाजबांधव, मित्र परिवार आणि समाजमन सुन्न झाले आहे.