जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथे साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
समाधान बंडू कोळी (वय ४०, रा. जळके रोड, शिरसोली ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून तो एक वर्षापासून पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. एका खाजगी कंपनीत काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी दि. २६ मार्च रोजी सकाळी तो कंपनीतील कामावरून घरी आला. यानंतर दरवाजा बंद करून त्याने कुठल्यातरी नैराश्याखाली येऊन साडीने छताला गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान घटनेची माहिती कळताच पत्नीने आक्रोश केला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.