जळगाव :- ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून जास्त नफा मिळेल असे सांगून जळगाव शशरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेची १ कोटी ५ लाख २३ हजार ३३४१ रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा चार जणांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जळगावातील सोनल भिमराव उपलवार (वय-३४, रा. हरेश्वर नगर, जळगाव) रहायला असून 16 फेब्रुवारी ते 28 मार्च 2024 दरम्यान महिला प्राध्यापिकेच्या मोबाईलवर एका ग्रुपला जोडून विविध क्रमांकांवरून संशयितांनी संपर्क साधून ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादीचे पती, नणंद व सासु यांच्या विविध बँक खात्याद्वारे १ कोटी ५ लाख २३ हजार ३३४१ आरोपींनी स्वीकारले . मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिला प्राध्यापिकेने जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करीत आहेत.