जळगाव;- मिरवणुकीवर दगडफेक होऊन होमगार्डसह काही तरुण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी दि. २८ मार्च रोजी घडली होती . या दगडफेकीत कर्तव्यावर असणारे होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर जखमी झाल्याआवरही त्यांनी परिस्थिती हाताळण्याचे कर्तव्य पार पाडले होते. या कार्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेशवर रेड्डी यांनी श्री. सापकर यांना पाच हजार रुपये रिवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला.
शिरसोली प्रबो गावात शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर वराड गल्लीत दगडफेक झाली होती. यावेळी कर्तव्यापासून न हलता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडले. याकरिता होमगार्ड पंकज सापकर रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांचा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सन्मान केला.