भुसावळ;- बंद घर फोडून सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून शहरातील विद्यानगर येथे शुक्रवार २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली . याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शुभम प्रभाकर वानखेडे वय-२९, रा. विद्यानगर, भुसावळ येथे रहायला असून गुरुवार २८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता शुभम वानखेडे हे घर बंद करून कामाच्या निमित्ताने बाहेर निघून गेले असता चोरटयांनी संधी साधून घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आल्याने शुभम वानखेडे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंकरे हे करीत आहे.