जळगांवधार्मिक

जि.एम.फाउंडेशनचा पुढाकार : सुप्रीम कॉलनीतील ‘त्या’ मंदिरावर बसविले कॅमेरे

जळगाव l १० जुलै २०२३ l  शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात काहीजण मंदिराची साफसफाई करीत असताना त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमावरून काल दुपारी दोन गटांमध्ये वाद उफाळून प्रचंड दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. वेळीच घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेवून दोन्ही गटातील महिला व पुरुषांना पोलीस ठाण्यात आणले. तसेच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सुप्रीम कॉलनी परिसरात कार्यक्रमाचे नियोजन असल्याने तेथे साफसफाई करत असताना त्यास विरोध झाल्याने हिंदू मुस्लिम समोरासमोर आले. त्यातून वाद वाढत जावून दगडफेक सुरू झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला व पळापळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सदर घटनाही तेथे असणाऱ्या महादेव मंदिरावर साफसफाई करीत असताना झाला. त्यामुळे दोघं गटांकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले.
भविष्यात येथे काही दुर्घटना होऊ नये आणि जातीय सलोखा कायम रहावा व समाजकंटकांना या सीसीटीव्हीच्या माध्यमातून कैद करता यावे यासाठी महादेव मंदिरावर जी.एम. फाउंडेशन यांचेकडून सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले.
जळगाव पोलीस उप अधिक्षक संदीप गावित साहेब, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड साहेब, उपनिरीक्षक जगदाळे साहेब व उपनिरीक्षक गिरासे साहेब यांच्या कडे सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले.यावेळी अरविंदजी देशमुख, जी. एम. फाउंडेशनचे सदस्य यशवंत पाटील, भूषण भोळे, राहुल पाटील, रुपेश ठाकूर, मुविकोराज कोल्हे आधी उपस्थित होते.
यावेळी माननीय उपअधीक्षक संदीप गावित साहेब यांनी जी. एम. फाउंडेशनचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button