महाराष्ट्रगुन्हे

बँक दरोडा उत्कृष्ट तपासाबद्दल एलसीबी निरीक्षक शंकर शेळकेंना पोलीस महासंचालक पदक

जळगाव, मुक्ताईनगर कामगिरीची घेतली दखल, राज्यात केवळ ३ निरीक्षकांना पदक

खान्देश टाइम्स न्यूज | २६ एप्रिल २०२४ | महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात येते. हा बहुमान अकोला स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाला असून त्यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे. खळबळजनक गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास या सदराखाली प्रवर्ग तीनमध्ये हे सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन, गृह विभाग शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस पदक व पोलिस शौर्य पदक प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदारांना बोधचिन्ह सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरता दिलेल्या मंजुरीनुसार सन-२०२३ या वर्षाकरिता पोलिस विभागात उत्तम उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात आले आहे.

निरीक्षक शंकर शेळके यांनी जळगाव जिल्ह्यात असताना मुक्ताईनगर आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी असताना खून, दरोडा, घरफोडी सारख्या गुन्ह्याचा तात्काळ शोध लावल्याच्या त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. जळगावातील एसबीआय बँकेत झालेल्या दरोडा प्रकरणात त्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना हे पदक मिळाले आहे. महाराष्ट्रात ८०० पैकी केवळ ३ पोलीस निरीक्षकांना प्रवर्ग ३ मध्ये हे पदक मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button