राजकीयजळगांव

या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे; महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

खान्देश टाइम्स न्यूज l ०१ मे २०२४ l मागील दहा वर्षात आपल्याला फक्त खोटी आश्वासने आणि जुमलेबाजीच्या पलीकडे काहीही मिळालेले नाही. त्यामुळे जनता त्रस्त झालेली असून त्यांच्या मनात या सरकारविषयी प्रचंड राग दिसून येत आहे. त्यामुळे जनतेने ठरवलंय की यंदा जळगावात परिवर्तन आणायचं. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीची प्रचार सभा बुधवार, दि.१ रोजी शहरातील तांबापुरा येथे पार पाडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, काँग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती हारून नदवी, शहराध्यक्ष आसिफ शेख, जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, ॲड.ललिता पाटील, मजहर पठाण, माजी नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे, नगरसेवक सादिक खाटीक, आम आदमी पार्टीच्या शहरप्रमुख अमृता नेरकर, सरिता नेरकर, माजी नगरसेविका पार्वताताई भिल यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

करणदादा पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, ही निवडणूक लोकशाही आणि देश वाचविण्यासाठी आहे. आपल्याला आपला देश आणि लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क अतिशय विचारपूर्वक आणि प्रभावीपणे वाजवावे लागेल, असे सांगून येणाऱ्या १३ तारखेला अनुक्रमणिका क्रमांक १ वरील ‘मशाल’ चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी आदींनी मनोगत व्यक्त करून १३ तारखेला मशाल चिन्हाला मतदान करून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button