के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व डॉ. शाहीन काझी ज्यु. कॉलेजमध्ये उत्तीर्ण विद्यार्थिनींचे सत्कार
जळगाव l ०८ जून २०२३ l येथील अंजुमने खिदमते खल्क संचालित के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व डॉ. शाहीन काझी ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावी व बारावी नाशिक विभागीय मंडळाच्या परीक्षेत विशेष कामगिरी ने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचे सत्कार संस्था अध्यक्ष डॉ. अमानुल्लाह शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. संस्था उपाध्यक्ष मजीद सेठ ज़केरिया, डॉ. मोहम्मद ताहेर शेख, मुख्यध्यापिका तन्वीर जहाँ शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते डॉ. अमानुल्लाह शाह यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मुलींच्या शिक्षणा चे महत्व व गरज या विषयावर मार्गदर्शन केले.
अब्दुल मजीद सेठ ज़केरिया यांनी विशेष स्थान मिळविलेल्या विद्यार्थिनींना प्रतियेकी पाचशे रुपये रोख बक्षीस स्वरूपात देउन प्रोत्साहन दिले. इयत्ता दहावीत विद्यार्थिनी खान जुनेरा शाहीद ने 86.60 टक्के मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तर तांबोली खनसा मुरसलीन ने 86 टक्के मिळवून दुसरा , शेख अरबीना हफीज़ ने 84.20 मिळवून तिसरे क्रमांक प्राप्त केले. हुमेरा बानो मोहम्मद जिबराईल ने 83.40 टक्के व सबा इरम सिराज पिंजारी ने 82.40 टक्के मिळवून अनुक्रमे चौथे व पाचव्या क्रमांकावर येण्याचं बहुमान मिळवले. तसेच उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत सैय्यद नजी़फा शाहिद ने 74.67 टक्के गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला, अदिबा फिरदोस मोहम्मद रफीक ने 72.50 टक्के मिळवून दुसरा , खाटीक मिस्बाह एजाज़ ने 71.67 टक्के मिळवून तिसरा, शेख बुशरा अमानुद्दीन 71.33 टक्के मिळवून चौथा व मनियार तनज़ीला ईक्बाल ने 69.50 टक्के मिळवून पाचवे स्थान प्राप्त केले. सूत्रसंचालन मज़हरुद्दीन शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन मुश्ताक भिस्ती यांनी व्यक्त केले.यशस्वीते साठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.