आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने “जळगाव सिव्हिल”ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी अशोक बारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हिप रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहेत. त्यांच्या उपचारासाठी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी प्रयत्न करून अधिष्ठातांना सूचना केल्या होत्या.
जळगावातील रामेश्वर कॉलनी येथील अशोक बारी यांना सांधेदुखीचा खूप त्रास होत होता. त्यासाठी हिप रिप्लेसमेंटचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खाजगी रुग्णालयात लाखो रुपये नव्हते. तेव्हा, आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांच्या प्रयत्नांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे अशोक बारी ह्या रुग्णाची सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. यामुळे एका गरीब रुग्णचा मोफत इलाज होऊन तो रुग्ण बरा झाला आहे. अशोक बारी यांनी बरा होण्याचे श्रेय आ. राजुमामा भोळे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी, तज्ज्ञ डॉ. आर. एस अग्रवाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दिले.
जळगावच्या सरकारी रुग्णालयात महायुतीच्या सरकारने अत्याधुनिक सुविधा, अद्ययावत शास्त्रक्रियागृह व आयसीयू उपलब्ध केली आहेत. लाखो रुपयांची महागडी शस्त्रक्रिया आता जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मोफत आणि चांगली झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे. तर दर्जेदार व अत्याधुनिक उपचारांसाठी रुग्णांनी रुग्णालयात यावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.