खान्देशराजकीयशासकीयसामाजिक

चांद्रयान ३ ने घेतली अवकाशात ऐतिहासिक झेप!

श्रीहरीकोटा ;– आज चांद्रयान दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी झेप घेतली असून . दुपारी २.३५ वाजता ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित करण्याचे इस्रोने जाहीर केले. संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान -३ ने आज (१४ जुलै) दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्री हरिकोट येथील सतीश धवन आंतरिक्ष केंद्रातून अवकाशात झेप घेतली.

चांद्रयान-३ (Chandrayaan-3) इस्रोच्या विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत प्रक्षेपित केले जात आहे. इस्रोने आतापर्यंत अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. यात मंगलयान, चांद्रयान १, चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ यांचा समावेश आहे. जवळपास ४ वर्षांपूर्वी विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत चांद्रयान २ प्रक्षेपित करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान -२ व्यवस्थित उतरु शकले नाही. त्यामुळे ही मोहीम त्यावेळी अयशस्वी ठरली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा चांद्रयान -३ ने अवकाशात झेप घेतली. तसेच चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button