सामाजिकजळगांव

“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद; आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे आयोजन

खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे “झेंडूचं फुल” हि अस्सल लेवा गणबोली भाषेतील, हसता हसता गंभीर भाष्य करणारी नाट्यकलाकृती सलग दोन दिवस छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दाखविण्यात आली. दोन्ही दिवस प्रचंड प्रतिसादासह जळगावकरांनी उपस्थिती दिली.

स्नेहयात्री प्रतिष्ठान निर्मित “झेंडूचं फुल” हे नाटक वीरेंद्र पाटील यांनी लेखन व दिग्दर्शन करून तयार केले आहे. त्याला राज्यशासनासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यात ७ कलाकारांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण दाखवून किती हाल अपेष्टा सहन करून तो स्वतःच्या परिवारासह समाज व देशासाठी योगदान देत असतो हे प्रभावीपणे सादर केले आहे. नाटकाच्या सुरुवातीला कलाकारांसह तंत्रज्ञांचा सन्मान खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्यासह माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेविका रंजना वानखेडे, गायत्री राणे, राजू मराठे, विजय वानखेडे, दीप्ती चिरमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खा. स्मिता वाघ यांनी मनोगतातून कलाकारांना शुभेच्छा देऊन प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासून शेतकऱ्याच्या कष्टाचे ऋण फेडले पाहिजे असे सांगितले. तर आ. भोळे म्हणाले, युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे. शेती ओस पडते कि काय अशी स्थिती काही ठिकाणी दिसत आहे. आधुनिक शेती करून उत्पन्न घेता येते. शेतकरी राजा देशाचा पोशिंदा आहे. त्याला जगविणे हे समाज म्हणून आपले कर्तव्यच आहे, असेही आ. भोळे यांनी सांगितले. नाटक पाहण्यासाठी दोन्ही दिवस सभागृह हाऊसफुल्ल होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button