सामाजिकजळगांव

आसोदा येथे वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवनाचे लोकार्पण !

ज्येष्ठ मंडळी ही सर्व समाजाचे आधारस्तंभ व संस्काराचा ठेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

खान्देश टाइम्स  न्यूज l आसोदा /जळगाव l वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवन हे जेष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी एक विरंगुळा केंद्र आहे. आपली वडीलधारी जेष्ठ मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. जेष्ठांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी या विरंगुळा केंद्राचा उपयोग होई. वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवनाच्या कामाला सुमारे ३५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला .वडीलधारी मंडळींचे अनुभव आणि ज्ञान हे आपल्यासाठी अमूल्य असून त्यांच्या कष्टांमुळेच व आशीर्वादामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. आसोदा येथील मोठ्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच काम पूर्ण होईल. असा विस्वस्वास व्यक्त करून ज्येष्ठ मंडळी ही सुसंस्काराचा ठेवा आणि सर्व समाजाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ते आसोदा येथे जेष्ठ नागरिक भवनाचे लोर्पण प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचें अध्यक्ष डीगंबर भोळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे होते.

डी.पी.डी.सी , शासनाच्या मुलभूत योजनेतर्गत (२५१५) असोदा येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोठा टी. व्ही., डिश कनेक्शन, शौचालय बांधकाम , साहित्य व फर्निचरसह जेष्ठ नागरीक भवनाचे बांधकाम, संरक्षकभिंत व आवारात पेव्हिंग ब्लॉक बसविणे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. राजू मामा भोळे यांनी सुमारे ३५ लक्ष निधी मंजूर केला होता. तालुक्यातील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून मंत्री गुलाबराव पाटील यांना जेष्ठ नागरिक धन्यवाद देत आहे.

९९ वर्षाच्या आजीचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार :
सुरुवातीला तालुक्यातील आसोदा येथे वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवनाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सौ. उषा चिंधू महाजन यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवासा निमित्त अमेरिकेत वास्तव्याला असलेले नितीन महाजन यांनी ७५ वर्ष पूर्ण झालेल्या २०० जेष्ठांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काठ्या वाटप करण्यात आले. यावेळी ९९ वर्ष वयाच्या आजी गीताबाई येवले यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार करून प्रत्येक जेष्ठाशी त्यांच्या जागेवर जावून त्यांच्याशी संवाद साधून समया जाणून घेतल्या.

यांची होती उपस्थिती :
याप्रसंगी आ.राजूमामा भोळे, संघाचे अध्यक्ष डीगंबर भोळे, उपाध्यक्ष चिंधू महाजन, सचिव रमेश पाटील, उपसरपंचपती गिरीश भोळे, सुभाष महाजन, अनिल महाजन. नरेंद्र भंगाळे, डी.एम. सावदेकर, मुकुंदराव नन्नवरे, प्रफुल्ल सावदेकर, तुषार महाजन, किशोर चौधरी , अजय महाजन, सुनील पाटील, अनिल कोळी, शरद नारखेडे, संज्योत कोळी, महेंद्र जोहरे, संदीप नारखेडे, उमेश बाविस्कर, दीपक माळी, संजय बिऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी , महिला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष डीगंबर भोळे यांनी केले. सूत्रसंचालन जेष्ठ नागरीक संघाचे सचिव रमेश पाटील यांनी केले. तर आभार जेष्ठ नागरीक संघाचे उपाध्यक्ष चिंधू महाजन यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button