खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l शहरातील जुने जळगाव परिसरातील कालिकामाता मंदिरामध्ये नवमीच्या पवित्र दिवशी शहराचे आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळेला देवी मातेचे आमदार भोळे दांपत्याने दर्शन घेतले.
शहरात नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. सर्व देवीदेवतांचे मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आशीर्वाद घेण्यासाठी ओसंडून वाहत आहे. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला आमदार राजूमामा भोळे मित्र परिवारातर्फे मंदिरांची स्वच्छता करण्यात आली होती. शनिवारी नवमीच्या पवित्र दिवशी जुने जळगाव येथे आमदार राजूमामा भोळे तसेच माजी महापौर सीमा भोळे यांनी उपस्थिती दिली.
या वेळेला देवी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी होम हवन केले. तसेच महाआरती करून मंदिरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळेला मंदिरातील महिला मंडळ, संस्थेचे सदस्य तसेच योगेश्वर नगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.