खान्देश टाइम्स न्यूज l १७ ऑक्टोबर २०२४ l शेंदुर्णी येथे ४ सप्टेंबर रोजी झालेल्या दगडफेकी च्या पूर्वी बिलाल शेख हे रस्त्याने जात असताना त्यांना पाच तरुणांनी थांबऊन शिवीगाळ करून कुऱ्हाडी ने डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले होते.
शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रावरून त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले परंतु बिलाल हे गंभीर जखमी असल्याने त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर तातडीची शस्त्र क्रिया करण्यात आली.
पहूर पोलिसांनी बयान घेऊन सुद्धा अद्याप कारवाई नाही :
बिलाल शेख यांची सहाय्यक फौजदार भरत लिंगायत यांनी दिनांक ८ सप्टेंबर रोजी खाजगी दवाखान्यात येऊन बयान घेतले असता बिलाल यांनी स्पष्टपणे सुदाम कोळी, योगेश कोळी, मंगेश कापुरे, अभिमन्यू कोळी व गोपाळ जाटेरे यांनी मारहाण केल्याचे नमूद केले असताना पोलिसांनी नोंदविलेल्या एफ आय आर क्रमांक ३०७ /२४ मध्ये ४०दिवस लोटले तरी त्यांची नावे समाविष्ट केले नाही व बिलाल ची वेगळी तक्रार नोंविली नाही.
एकता संघटनेतर्फे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पहूर पोलिसांनी बिलाल सोबत केलेल्या अन्यायाबाबत सर्व कागदो पत्री पुरावे दाखवले असता अपर पोलीस अधीक्षक नखाते यांनी त्वरित पोलीस उपविभागीय अधिकारी व पहूर पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून बिलाल ने दिलेल्या जबाब प्रमाणे आरोपींचे व्हेरिफाय करून संबंधित गुन्ह्यात त्यांची नावे समाविष्ट करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे आदेश पारित केले.
“त्या” खाजगी दवाखान्याबद्दल नाराजीचा सूर :
बिलाल यास शासकीय रुग्णालयातून खाजगी दवाखान्यात त्याच रात्री जळगाव च्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शिफ्ट केले व दुसऱ्या दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. खाजगी दवाखान्यात ५ ते १४ सप्टेंबर पर्यंत उपचार झाले व सुमारे ८० ते ९० हजार रुपये बिलाल च्या नातेवाईकांनी वर्गणी करून दवाखान्याचा खर्च भरून सुद्धा बिलाल यांना अद्याप पर्यंत वारंवार मागणी करून सुद्धा इंजूरी सर्टिफिकेट संबंधित दवाखान्याने न दिल्याने बिलाल व त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
प्रसंगी फारुक शेख, नदीम मलिक, मजहर पठाण, अहमद सर, अनिस शहा, आसिफ शेख, सय्यद इरफान अली, युसुफ खान, इमरान गनी, सईद फैयाज, मुक्तार हनीफ, अझहर शेख अलीम, तर शेंदुर्णी येथील इमरान शेख, नदीम शेख, कामरान शेख, इकरार शेख, स्वतः बिलाल शेख, सौ. शमीम रऊफ, फिरोजा बी अमीर, जारा बी सलीम व शकीला बी शेख लाल आदींची उपस्थिती होती.