गुन्हेजळगांव

डेरेदार निंबाच्या झाडांची कत्तल करुन अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर वन विभागाच्या ताब्यात

जळगांव l १४ जुलै २०२३ l भडगाव प्रतिनिधी l आखतवाडे शिवारातून डेरेदार नींबाच्या झाडांची कत्तल करुन अवैधपणे वाहतूक करताना आढळले. या बाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आण्णा मोरे यांनी या बाबत विचारणा केली असता उडवा उडविची उत्तरे ट्रॅक्टर धारका तर्फे देण्यात आली. या बाबत वन विभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दोन्हीही अवैध लाकूड वाहतूक करणारे ट्रॅक्टर भडगाव येथे पुधील कारवाई साठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

या बाबत अधिक महिती अशी की, आखतवाडे शिवारातून हिरवेगार व डेरेदार निंबाच्या झाडांची अवैध कत्तल करून आज सकाळी सात वाजता नगरदेवळा रेल्वे स्टेशन कडून भडगाव कडे विना नंबरचे दोन ट्रॅक्टर लाकडांची वाहतूक करत असताना सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आण्णा मोरे यांनी थांबवले व विचारणा केली असता ट्रॅक्टर धारकांनी उडवा उडवीची उत्तर देत अवैध वाहतूक करत असल्याचे लक्षात येताच या बाबत भडगाव पाचोरा रेंजर ऑफिसर मुलाणी, वनपाल नंदू पाटिल, नाकेदर मुकेश बोरसे यांना या बाबत महिती दिली असता भडगाव पोलिस स्टेशनला हे ट्रॅक्टर जमा करा असे सांगितले. या वेळी वनपाल नंदू पाटिल यांनी ट्रॅक्टर धारकांना पास बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना किंवा पास नसल्याने अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन्हीही विना नंबरचे ट्रॅक्टर हे भडगाव येथील पाचोरा रोड वरिल स्वामिल व चाळीसगांव रोड वरील स्वामील येथे जमा करण्यात आले आहे. यांचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई साठी दोन्हीं ट्रॅक्टर जमा करण्यात आल्याची माहिती वनपाल नंदू पाटिल यांनी दिली आहे. तसेच यापुढे अवैध लाकूड तस्करांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळ सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button